Popular Posts

Friday, April 15, 2011

'अक्षय लावणी- मान्यवरांची ही अशी दाद



अरुण दाते यांची प्रतिक्रिया......
आज "अक्षय लावणी' कार्येक्रमाला जाता आले.गेल्याबद्दल अतिशय आनंद झाला. महाराष्ट्रातील लोकप्रिय कला -गायन प्रकारापैकी एक. लावणीची कविता ही स्वच्छंद असते. शब्द आणि लय ह्याच्या हातात हात घालून लावणी पुढे जात असते.. आजच्या कर्येक्रमाला खरे तर लावणीचा इतिहास असेही नाव देता येईल. सर्वच गायक गायिका सुरेल आवाजात लावणीची रंगत वाढवत होत्या. सुरा बरोबरच ढोलकी आणि तबला लावणीला लागणारी लय सादर करत होते.एक सुंदर सुश्राव्य संगीत कार्येक्रम आज ऐकायला मिळाला.
धन्यवाद. !
---------------

अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया ...
'अक्षय लावणी' या कार्येक्रमात लावणीचा जन्म ,प्रवास व सध्याची लावणी हा इतिहास समजला अतिशय नाविन्य पूर्ण उपक्रम आहे. सर्वच कलाकारांनी प्रेमाने मनापासून जीव ओतून सादर केलेल्या लावण्या अभिनंदनास पात्र आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे या कार्येक्रमाला जरूर मदत करेल...
-----------------
दाजीकाका गाडगीळ यांची प्रतिक्रिया...
"अक्षय लावणीचा" कार्येक्रम ऐकून अंगात तरुणपण आले. लावणी म्हणजे संगीताचे लावण्य. प्रत्येकाने आवर्जुन हा कार्येक्रम ऐकायला हवा असा माहिती पूर्ण कार्येक्रम. सर्वच कलाकार संच उत्तम...गावोगाव याचे खूप प्रयोग व्हावेत
------------------
स्वाती पाटणकर (वृत्तनिवेदिका, मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनी )
"अक्षय लावणी" अतिशय सुंदर, सुंदर नेपथ्य, सर्वच साथीदार छान, उत्स्पुर्त निवेदन, गायक गायिका तर मुकुट मणीच ....एकंदरीतच जमलेला कर्येक्रम सातत्याने प्रयोग करीत राहिल्यास "अक्षय लावणी" अटकेपार झेंडा नक्कीच लावेल...अनेक शुभेच्छा ....
----------
श्रीकांत मोघे
गतवैभवाची अनुभूती देणारा दर्जेदार सुंदर कार्येक्रम "अक्षय लावणी"
-------------------------
कृष्णकांत कुदळे (मुख्य संयोजक, पुणे फेस्टिवल)
सौ. धनश्री ताईंचा अक्षय लावणीचा कार्येक्रम हा एकमेवाद्वितीय असा आहे. लावणीचे वेगवेगळे प्रकार गायक फारच उत्कृष्ठपणे गातात निवेदनही उत्तम आहे सामान्य वर्ग जो लावणी पासून स्वतःला दूर समजतो तो नक्कीच या कार्येक्रमामुळे लावणीला आपली कला समजेल अशी आशा आहे. शुभेच्छा
--------------
सुलभा तेरणीकर (जेष्ठ वृत्तपत्रकार)
लावणी म्हणजे लावण्य. शृंगार रसाचे लावण्य जेंव्हा संगीतातून अवतरत तेंव्हा श्रोत्यांमध्ये आनंदाचे भरते येते. धनश्री तुळपुळे आणि त्यांचे सहकारी ,निवेदक, संगीत नियोजक, वादक यांना कौतुकाचे हे दोन शब्द.
-------------
वसंतराव पटवर्धन (माजी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र)
"अप्रतिम" या एकच शब्दात "अक्षय लावणी"चे वर्णन करावे लागेल. हा कार्येक्रम अक्षयचं राहील या माझ्या शुभेच्छा
---------------
विजय चव्हाण (प्रख्यात ढोलकीपटू),
सौ धनश्री तुळपुळे यांच्या "अक्षय लावणी' या कार्येक्रमातून लावणीचा प्रवास व इतिहास हे दोन विषय छान प्रेक्षकांच्या पुढे मांडले जातात. हे हे हल्लीच्या प्रेक्षकांसाठी अभ्यासनीय आहे.
--------------------

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण
गाण्याची निवडही खूप छान आहे.....
------------------------------
जगदिश खेबुडकर (प्रख्यात गीतकार )
मुळात लावणी ही अक्षय आहे. ती अक्षय लावणी जुन्यातली जुनी आणि नव्यातली नवी सादर केली. आणि
रसिकांची रसिकता कळसाला गेली.
गाण्याप्रमाणेच प्रबोधनात्मक निवेदन उल्लेखनीय. ..!!उपक्रम स्तुत्य. !
कौतुकास्पद या "अक्षय लावणीने उभ्या महाराष्ट्राला सांस्कृतिक जाग यावी ही शुभेच्छा !!!!!
--

श्री व सौ वैशाली हेर्लेकर
लावणी सोज्वळ, व मंगल वातावरणात ऐकायला मिळणे हे अतिशय सुखद आहे. त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद. नुसती लावणी ऐकणे आणि त्यातील सर्व रेशीम लडी उलगडून दाखवल्यावर ऐकणे म्हणजे लावणीचा खराखुरा आस्वाद घेणे . आणि हि सुवर्ण संधी तुम्ही मिळवून दिलीत. पुढील सर्व कार्येक्रमांसाठी "बेस्ट ऑफ लक "
-----------------
श्री व सौ. सुनिले शिंदे (टाटा मोटर्स पुणे)
कार्येक्रमाची कल्पना अतिशय सुंदर असून मराठी साहित्य कलेचा हा एक उत्कृष्ठ नमुना आहे.अक्षय लावणी कार्येक्रम सर्वांनी सहकुटुंब पाहावा.
---------------